Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Health Camp : रंगमंच कामगारांसाठीच्या आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद!

Health Camp : रंगमंच कामगारांसाठीच्या आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद!

मुंबई : नाट्यक्षेत्रासाठी अविरत झटणाऱ्या रंगमंच कामगारांसाठी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात मोफत आरोग्य शिबीर आयोजित केला होता. त्या आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘अष्टविनायक' नाट्यसंस्थेचे दिलीप जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित केले्या या शिबीरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला १५०हून अधिक रंगमंच कामगारांनी मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला मसलतीचा लाभ घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.

'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन'चे डॉ.गजानन रत्नपारखी, विशाल कडणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या दोघांच्या विशेष सहकार्याने या शिबिराचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. यावेळी दिलीप जाधव यांनी 'गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन' चे डॉ. गजानन रत्नपारखी, विशाल कडणे यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Comments
Add Comment