Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Jioचे दिवाळी गिफ्ट! हा इंटरनेट प्लान झाला खूप स्वस्त

Jioचे दिवाळी गिफ्ट! हा इंटरनेट प्लान झाला खूप स्वस्त

मुंबई: देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून(reliance jio) दिवाळी ऑफर म्हणून फ्री इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. कंपनीने याआधी सप्टेंबरमध्ये एअरफायबरसोबत एक वर्षांसाठी मोफत इंटरनेट प्लान सादर केला होता. त्यातच आता दिवाळीच्या आधी जिओकडून खास प्लान सादर करण्यात आले आहेत. यातील एक प्लान असाही आहे जो ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटा प्लान ऑफर करत आहे. अशातच ग्राहकांकडे संधी आहे की ते अधिकाधिक इंटरनेटचा वापर करू शकतात.

रिलायन्स जिओचा १०१ रूपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या १०१ रूपयांच्या प्लानला एअरटेल आणि वोडाफोन आयडियासारख्या टेलिकॉम कंपन्यांकडून टक्कर मिळू शकते. या १०१ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाचा फायदा मिळू शकतो. दरम्यान, ज्यांच्या भागात जिओचे ५ जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी आहे ते युजर्स याचा फायदा उचलू शकतात. प्लानसोबत १०१ रूपयांमध्ये ६ जीबी डेटा ४ जी कनेक्टिव्हिटीसोबत दिला जात आहे.

अतिरिक्त डेटासाठी करू शकता वापर

अशा युजर्ससाठी ज्यांना १ ते दीड जीबी डेटा दररोज खर्च करणे सोपे आणि अधिक इंटरनेटची गरज पडते. ते या प्लानचा फायदा उचलू शकतात आणि १०१ रूपयांचा प्लान घेऊन तुम्ही अतिरिक्त डेटाचा वापर करू शकता.

Comments
Add Comment