Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीChandrapur News : अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार कारवाई!

Chandrapur News : अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार कारवाई!

चंद्रपूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali Festival) चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे (Municipal Corporation) निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असून अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

परवानगी न असलेल्या ठिकाणांहून फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अशा प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.

हरित दिवाळीच साजरी करण्याचे आवाहन

मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी व फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्याचे तसेच ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असल्याचे नमुद असेल तेच फटाके घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -