
मुंबई : शिवसेनेच्या (Shinde Shivsena) सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. सर्व आमदारांना पक्ष कार्यालयातून सायंकाळी ६ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीदरम्यान बंगल्यावर सर्वांना एबी फॉर्म वाटले जाणार असून विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सर्व आमदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहेत.