मुंबई : ‘मधुबाला’ फेम अभिनेत्री दृष्टी धामीने (Drashti Dhami) आनंदाची बातमी दिली आहे. लग्नाच्या तब्ब्ल ९ वर्षानंतर अभिनेत्री दृष्टी धामीच्या घरी चिमुकल्याचं बाळाचं आगमन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दृष्टी तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. आता तिने सोशल मीडियाच्या आधारे बाळाच्या स्वागताची माहिती दिली.
छोट्या पडद्यावरील टीव्ही मालिका मधुबाला प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रेम दिले होते. २१ फेब्रुवारी २०१५ साली अभिनेत्री दृष्टी धामी हिचा विवाह मोठा व्यापारी नीरज खेमकासोबत झाला होता.
दरम्यान, दृष्टी धामीने मुलीच्या जन्माची बातमी शेअर करताना एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘थेट स्वर्गातून तुमच्या हृदयात, एक नवीन जीवन, एक नवीन सुरुवात, ती आलीय…’ असे कॅप्शनमध्ये लिहले आहे. या पोस्टवर सर्व चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
View this post on Instagram