Wednesday, December 4, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वSBIची ४४४ दिवसांची शानदार स्कीम...जबरदस्त व्याज आणि बरंच काही...

SBIची ४४४ दिवसांची शानदार स्कीम…जबरदस्त व्याज आणि बरंच काही…

मुंबई: देशातील सर्वात मोठी सरकारी कंपनी एसबीआय अनेक गुंतवणूकदारांसाठी चांगला सेव्हिंग प्लान आहे. यात मिळणारे जोरदार रिटर्न्स यांना खास बनवत आहे. वरिष्ठ नागरिकांनाही अधिक फायदा मिळतो.

अशीच एक खास स्कीम एसबीआयने आणली आहे. ही आहे अमृतवृष्टी. ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. यात गुंवतणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ४४४ दिवसांसाठी पैसै जमा करावे लागतील आणि यावर बँकेकडून ७ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज दिले जाईल.

एसबीआयच्या वेबसाईटनुार या स्कीममध्ये सामान्य ग्राहकांना ७.२५ टक्के व्याज दर ऑफर केले जात आहे. तर दुसरीकडे वरिष्ठ नागरिकांसाठी या स्कीममध्ये ४४४ दिवसांसाठी वर्षाला ७.७५ टक्के व्याजदर मिळत आहे.

बँकेकडून या स्पेशल स्कीमची सुरूवात १५ जुलैला करण्यात आली होती. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या एसबीआयच्या स्कीममध्ये गुंतवणूकदार केवळ १०० रूपयांच्या कमीत कमी गुंतवणुकीसह अकाऊंट सुरू करून गुंतवणूक सुरू करू शकतात. तर अधिकाधिक गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही.

अमृतवृष्टी योजनेमध्ये कालावधीच्या आधी पैसे काढण्याची सुविधा आहे. यासोबतच ग्राहकांना आपल्या गुंतवणुकीवर लोनही मिळते. ग्राहक एसबीआय ब्राँचसह योनो एसबीआय आणि योना लाईट अॅप्स अथवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊनही अकाऊंट सुरू करू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -