मुंबई: काळा टिक्का लावल्याने आपले वाईट नजरेपासून संरक्षण होते. मात्र अनेकांना हा काळाच रंग आवडत नाही. याचमुळे सावळ्या रंगाच्या लोकांना अनेकदा आपल्या जीवनात त्रास सहन करावा लागतो. असेच काहीसे प्रकरण उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून समोर आले आहे. येथे एका नवविवाहितेने आत्महत्या केली. यामागचे कारण म्हणजे तिचे लग्न एका सावळ्या मुलाशी झाले होते.
सावळ्या रंगाच्या मुलाशी लग्न झाल्यामुळे ही नवविवाहित तरूणी खुश नव्हती. अशातच लग्नाच्या चार महिन्यांनी तिने फाशी लावून घेत आत्महत्या केली. सूचना मिळताच पोलिसांच्या नंतर माहेरचे लोकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चौकशी केली आणि तपासानंतर नवविवाहितेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
ही घटना हाथरस शहरातील कोतवाली क्षेत्राच्या मोहल्ला सीयल खेडा जैन गल्लीतील आहे. येथील तौफीक नावाच्या तरूणीचे ४ महिन्यांपूर्वी अलीगढच्या बरौला जाफराबाद येथे राहणाऱ्या सिमरनसोबत लग्न झाले होते. सिमर आपल्या पतीच्या सावळ्या रंगामुळे नाखुश होती. तिला आपल्या पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळेच तिने आत्महत्या केली.
सिमरनच्या कुटुंबियांनी सांगितले की ४ महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पती सावळा होता. अशातच तिचे पतीशी भांडण होत असे. त्यातच तिने मंगळवारी फाशी लावून घेत आत्महत्या केली.