मुंबई : काही महिन्यांपूर्वी स्विगीसह झोमॅटो (Zomato) या फूड डिलीव्हरी (Online Food Delivery) कंपनीने प्लॅटफॉर्म फी वाढवली होती. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन फूड डिलीव्हरी चांगलीच महाग पडत होती. त्यानंतर ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा झोमॅटो कंपनीने त्यांच्या डिलिव्हरी चार्जमध्ये (Zomato Platform Fee) वाढ केली आहे. त्यामुळे झोमॅटोवरून फूड ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना वाढत्या महागाईत ऑनलाईन फूड डिलीव्हरीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी झोमॅटो कंपनीने प्लॅटफॉर्म फीमध्ये २० टक्के वाढ केली होती. मात्र आता ही फी ६० टक्क्याहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे ग्राहकांना प्रति ऑर्डरद्वारे प्लॅटफॉर्म फी ७ रुपयांऐवजी १० रुपये द्यावे लागणार आहेत.
नेमके कारण काय?
सणासुदीच्या कालावधीत झोमॅटो कंपनीचे ऑपरेशनल खर्च भरून काढण्यासाठी आणि सेवा देण्यासाठी प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केल्याचे सांगितले आहे. तसेच ही वाढ कंपनी सुरु ठेवण्यासाठी आणि इतर बिले भरण्यासाठी द्रखील उपयोगी पडू शकते असेही म्हटले आहे.