पाहा कोणाला मिळणार संधी?
मुंबई : नुकतेच भाजपा आणि शिंदे शिवसेना गटाच्या विधानसभा निवडणूक (Assembly Election) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये एकूण ३८ उमेदवारांचा समावेश आहे.
पहिल्या यादीमध्ये अजित पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे.