मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. यात ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार आहे तर ठाणे येथून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. रत्नागिरी येथून सुरेंद्रनाथ माने यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून घमासान सुरू होते. मात्र यावर आता संमती झाली आहे. उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आता ८५-८५ जागांवर निवडणूक लढवतील.
हे आहेत उमेदवार
उन्मेश पाटील – चाळीसगाव
वैशाली सूर्यवंशी – पाचोरा
सिद्धार्थ खरात – मेहकर
नितीन देशमुख – बालापूर
गोपाळ दाटकर – अकोला पूर्व
सिद्धार्थ देवळे – वाशिम
सुनील खराटे – वडनेरा
विशाल बरबटे – रामटेक
संजय दरेकर – वणी विधानसभा
एकनाथ पवार – लोहा
राहुल पाटील – परभणी
विशाल कदम – गंगाखेड
सुरेश बनकर – सिल्लोड
उदयसिंह राजपूत – कन्नड
किशनचदं तनवाणी – संभाजीनगर मध्य
राजू शिंदे – संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी – वैजापूर
गणेश छात्रक – नांदगाव
अद्यय हिरे – मालेगाव
अनिल कदम – निफाड
वसंत गीते – नाशिक मध्य
सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
जयेंद्र दुबला – पालघर
डॉ. विश्वास वळवी – बोईसर
महादेव घाटल – भिवंडी ग्रामीण
राजेश वानखेडे – अंबरनाथ
दिपेश म्हात्रे – डोंबिवली
सुभाष भोईर – कल्याण
नरेश मणेरा -ओवळा-माजिवाडा
केदार दिघे – कोपरी-पाचपाखाडी
राजन विचारे – ठाणे
एमके मढवी – ऐरोली
उदेश पाटकर – मागाठाणे
सुनील राऊत – विक्रोळी
रमेश कोपरगावकर – भांडुप पश्चिम
अनंत नर – जोगेश्वरी पूर्व
सुनील प्रभू – दिंडोशी
समीर देसाई – गोरेगाव
प्रकाश फातर्पेकर – चेंबूर
ऋतुजा लटके -अंधेरी पूर्व
प्रविणा मोरजकर – कुर्ला
संजय पोतनीस – कलीना
वरूण सरदेसाई – वांद्रे