Jaya Bachchan Mother Death: बॉलिवूडमधील अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचं निधन झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी इंदिरा भादुरी यांनी अखेरचा श्वास घेतलाय. इंदिरा भादुरी यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, अशी माहिती सध्या समोर येत आहे. बच्चन कुटुंबावर इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवार रात्री इंदिरा भादुरी यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे अमिताभ तातडीने भोपाळच्या दिशेने रवाना झाले. जया बच्चनसुद्धा भोपाळमध्ये पोहचल्या होत्या. मात्र, इंदिरा यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि भोपाळमधल्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.