Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीBengaluru : अरे बाप रे! ७ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळली;...

Bengaluru : अरे बाप रे! ७ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणात कोसळली; ७ जणांचा मृत्यू

Bengaluru : कर्नाटकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २२ ऑक्टोबर रोजी बेंगळुरूमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. कर्नाटकमधील बाबूसापल्य परिसरामध्ये इमारत कोसळल्यानंतर आणखी ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातात झालेल्या मृतांची संख्या सात झाली आहे. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एका मजुराचा २२ ऑक्टोबरच्या रात्री मृतदेह सापडला. १३ कामगारांना वाचवण्यात यश आलं असून सहा जण जखमी झाले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल की, ज्यांच्या नावावर इमारत बांधली जात होती भवन रेड्डी आणि कंत्राटदार मुनियप्पा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, या इमारतीत केवळ ४ मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती, मात्र ७ मजले बांधले जात आहेत. एनडीआरएफच्या पथकाने ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर बचावकार्य केले. आज सकाळी श्वानपथक पथकालाही पाचारण करण्यात आले. टीमने ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या मशिन्ससुद्धा मागवल्या आहेत.

कर्नाटकात इमारत कोसळल्यानंतर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसवर विरोधी पक्ष जेडीएसने बेंगळुरूची दुर्दशा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, दुबई आणि दिल्लीत काय चालू आहे ते तुम्ही पाहिलं असेलच. देशाच्या विविध भागांत हीच परिस्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही, परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत.

बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात आहे

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मंगळवारी रात्री घटनास्थळी पोहोचले होते. २१ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची त्यांनीच माहिती दिली. ६०/४० जागेवर बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बिहारमधील ३ मृत

अतिरिक्त आयुक्त म्हणाले की, ५ मृतांपैकी ३ मजूर बिहारचे होते, त्यांची नावे हरमन (२६), त्रिपाल (३५), मोहम्मद साहिल (१९) अशी आहेत. त्याच वेळी, सत्य राजू (२५) आणि शंकर यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गेले तीन दिवस कर्नाटकात पाऊस

गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बंगळूरसह कर्नाटकातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तर बंगळूरच्या येलाहंका आणि आसपासच्या अनेक भागात पूर आलाय. येलहंकामधील मध्य विहार कंबरभर पाण्याने भरले आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -