Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीAmit Thackeray : लेकाला औक्षण करताना आईच्या डोळ्यात पाणी, शर्मिला ठाकरे म्हणाल्या,...

Amit Thackeray : लेकाला औक्षण करताना आईच्या डोळ्यात पाणी, शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘ओवाळणीत एक रुपयाही नको, पण

मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (मनसे) ४९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आली आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित राज ठाकरे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मनसैनिकांमध्ये (MNS) चैतन्य संचारले आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते आज अमित ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले होते.

यावेळी शिवतीर्थवर मनसेकडून उमेदवारी मिळालेले नेतेसुद्धा आले होते. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचे औक्षण केले. तर मिताली ठाकरे यांनी त्यांचे पती अमित ठाकरे यांचे औक्षण केलं. यावेळी शर्मिला ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांचे औक्षण करताना म्हंटल की, ‘आम्हाला ओवाळणीत १ रुपयाही नको, पण आमदारकी पाहिजे’.

शर्मिला ठाकरे अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. शर्मिला ठाकरे यांचे डोळे यावेळी पाणावले होते. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ही सगळीचं माझी मुलं आहेत. या सगळ्यांनी आमदार व्हायलाचं पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. अमित ठाकरे यांच्यासमोर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान असणार आहे.

माहीम विधानसभेत ठाकरे गटाने अमित ठाकरे यांच्याविरोधात महेश सावंत यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. माहिममधील महेश सावंत हे जुने कार्यकर्ते आहेत. मतदारसंघातील त्यांचा लोकांशी उत्तम जनसंपर्क आहे. त्यांना मानणारा या भागातला मोठा वर्ग आहे. त्यामुळे माहीमची लढाई ही अमित ठाकरे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत या तगड्या नेत्यांचे आव्हान कशाप्रकारे परतवून लावणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -