मुंबई: काँग्रेस नेते प्रियंका गांधी यांनी आज बुधवारी २३ ऑक्टोबरला केरळच्या वायनाड मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला. या दरम्यान त्यांच्यासोबत आई सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. अर्ज दाखल करताना त्यांनी आपली संपत्तीही घोषित केली. यात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे ८ लाखांची कार आणि १.१५ कोटींचे सोने आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वायनाड येथून आपल्या पहिल्या निवडणुकीच्या सामन्यासाठी अर्ज दाखल करण्याआधी प्रियंका गांधी सकाळी पावणेबारा वाजता वायनाडच्या कलपेट्टा येथे रोड शोमध्ये सामील झाले होते.
प्रियंका गांधींची किती आहे संपत्ती?
प्रियंका गांधी यांनी दाखल केलेल्या अर्जात ४ कोटी २४ लाखांची अस्थायी संपत्ती घोषित केली. त्यांच्याकडे ५२ हजार रूपये कॅश, २ कोटी २४ लाखांचे म्युच्युअल फंड, बँक खात्यामध्ये साधारण ३ लाख ६० हजार रूपये, पीपीएफ खात्यामध्ये १७ लाख ३८ हजार रूपये, एक होंडा एसयूव्ही कार याची किंमत ८ लाख रूपये आहे. ही त्यांना पतीने गिफ्ट केली आहे. याशिवाय १ कोटी १५ लाखांचे सोने आणि २९ लाख रूपयांची चांदी त्यांच्याकडे आहे.