मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात चांदीची एक वस्तू ठेवणे अतिशय फायदेशीर ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत चांदीचा मोर ठेवणे अतिशय शुभदायक मानले जाते.
घरात चांदीचा नाचणारा मोर ठेवल्याने धन आणि बुद्धि दोन्ही आकर्षित होते. वास्तुशास्त्रानुसार चांदीचा मोर घरात ठेवल्याने घरातील अनेक वास्तुदोष दूर होतात.
घरात कोणालाही विवाहामध्ये समस्या येत असेल तर घरात चांदीचा मोर ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. जर घरात लाईफ पार्टनरसोबत चांगले संबंध नसतील तर घरात चांदीचा मोर ठेवला पाहिजे.
व्यापारात नुकसान होत असेल तर चांदीचा मोर दुकानात अथवा ऑफिसमध्ये दक्षिण पूर्व दिशेला अथवा घराच्या तिजोरीत ठेवला पाहिजे. जर तुम्ही असे करत असाल तर पैशासंबंधित अनेक अडचणी संपतील. यासोबतच व्यापारात फायदा होईल.
चांदीचा मोर जर घराच्या ड्रॉईंग रूमध्ये ठेवत असाल तर असे केल्याने सुख-समृ्द्धी आणि शांतीचा वास होतो.
टीप – वर देण्यात आलेली माहीती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.