मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(BCCI) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर(australia tour) जाणाऱ्या इंडिया एच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात दोन फर्स्ट क्लास सामने खेळवले जातील. फर्स्ट क्लास सामन्यांच्या या मालिकेसाठी इंडिया एच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन फर्स्ट क्लास सामन्यांची सुरूवात ३१ ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिला सामना ३ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. याशिवाय मालिकेतील दुसरा सामना ७ पासून १० नोव्हेंबर यांच्यात रंगेल. पहिला सामना मकाय आणि दुसरा मेलबर्नमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर इंडिया एचा संघ भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध १५ नोव्हेंबरपासून तीन दिवसांची इंट्रा स्क्वॉड सामना पर्थमध्ये खेळणार आहे.
इंडिया ए दौऱ्यासाठी गेल्या काही काळापासून टीम इंडियामधून बाहेर असलेला विकेटकीपर फलंदाज इशान किशनलाही समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अभिमन्यू ईश्वरनला गायकवाडचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय संघात अनेक स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी इंडिया ए टीम
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, ईशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुथार, तनुष कोटियान.