Mobile recharge: वर्षभराचा सर्वात स्वस्त प्लान, २७६ रूपयांत ९१२ जीबी डेटा, Unlimited 5G

मुंबई: जर तुम्ही प्रीपेड मोबाईल युजर्स(mobile users) असाल तर दर महिन्याला फोनचा रिचार्ज करण्याचे टेन्शन असते. दर महिन्याला रिचार्ज करणे आणि त्यातच रिचार्ज प्लान महाग झाल्यास खिशावर आणखी बोजा पडतो. अशातच आम्ही तुम्हाला भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ(jio), एअरटेल(airtel) आणि व्होडाफोन-आयडिया(vodafone-idea) यांचे असे काही प्लान्स सांगत आहोत जे एकदा रिचार्ज केल्यास वर्षभर टेन्शन राहणार नाही.


इतकंच नव्हे तर हे प्लान महिन्याच्या प्लान्सपेक्षा अधिक स्वस्त पडतात. याशिवाय जर एका वर्षात कधीही प्लान्स महागले तर तुमच्या खिशावर तितका परिणाम होत नाही.



Reliance Jioचा वार्षिक प्लान


जिओचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान ३५९९ रूपयांचा आहे. याची व्हॅलिडिटी संपूर्ण ३६५ दिवसांची असते. या प्लानमध्ये युजर्सला २.५ जीबी डेटा मिळतो. याचा अर्थ या प्लानसोबत युजर्सला एकूण ९१२.५० जीबी डेटा मिळतो. या प्लानसोबत युजर्स अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. सोबतच जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचे फ्री सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय युजर्सला Jio True5G म्हणजेच अनलिमिटेड ५ जी डेटाचा वापर करू शकतात.



Bharti Airtel चा वार्षिक प्लान


एअरटेलचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान १९९९ रूपयांचा आहे. हा जिओच्या वार्षिक प्लानच्या तुलनेत अतिशय स्वस्त आहे. याची व्हॅलिडिटीही ३६५ दिवसांची आहे. यात एकूण मिळून २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात Airtel Xtream, Spam Fighting Network, Apollo 24*7 Circle, Wynk Music चेही फ्री सबस्क्रिप्शन मिळते.



Viचा वार्षिक प्लान


व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त वार्षिक प्लान ३४९९ रूपयांचा आहे. या प्लानची व्हॅलिडिटी संपू्र्ण ३६५ दिवसांची आहे. या प्लानसोबत युजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला Binge All Night आणि वीकेंड डेटा रोलओव्हरचीही सुविधा मिळते.

Comments
Add Comment

सुझुकीने दुचाकीच्या किमती केल्या कमी; २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

मुंबई : जीएसटी २.० सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देईल, अशी घोषणा सुझुकी मोटरसायकल इंडियाने केली आहे.

मुंबई वगळता अन्य मनपा निवडणुका स्वबळावर - प्रफुल्ल पटेल

नागपूर : मुंबई महापालिका निवडणूक वगळता महाराष्ट्रात अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

‘आयफोन १७’च्या लाँचवेळी बीकेसी ॲपल स्टोअरमध्ये गोंधळ

मुंबई: बीकेसी 'जिओ सेंटर'मध्ये ॲपलच्या 'आयफोन १७' मालिकेच्या लाँचवेळी खराब गर्दी व्यवस्थापनामुळे शुक्रवारी

पुणेकरांची iPhone १७ खरेदीसाठी तुफान गर्दी !

पुणे : पुण्यात ॲपलने अधिकृत स्टोअर सुरू केले आहे. कोपा मॉलमध्ये सुरू झालेल्या या स्टोअरला पुणेकरांनी चांगलाच

ICC महिला विश्वचषक 2025: श्रेया घोषालच्या आवाजात ‘ब्रिंग इट होम’ थीम सॉन्ग प्रदर्शित!

मुंबई : महिला क्रिकेटमधील सामर्थ्य, एकता आणि थांबवता न येणाऱ्या जिद्दीचा उत्सव साजरा करत, इंटरनॅशनल क्रिकेट