Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Saie Tamhankar : पुन्हा सईची झेब्रा क्रॉसिंग थीम फोटोशूट चर्चेत!

Saie Tamhankar : पुन्हा सईची झेब्रा क्रॉसिंग थीम फोटोशूट चर्चेत!

मीम्स आणि सईच्या फोटोची चर्चा!


मुंबई : सईच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मानवत मर्डर्स मधल्या समिंद्री या भूमिकेचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी तोंड भरून कौतुक केले. सईने तिच्या रोजच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता सई पुन्हा चर्चेत आलीय ती तिच्या नव्या फोटो शुटमुळे!



इंडस्ट्रीत सई ही अशी एकमेव अभिनेत्री आहे जी कॉन्सेप्ट फोटो शूट करताना दिसते आणि याच वेगळेपणामुळे सईचं लेटेस्ट फोटो शुट चर्चेत आलं आहे. या लूक मध्ये सई झेब्रा क्रॉसिंग थीम वरच्या आउट फिट मध्ये दिसून आली आणि चाहत्यांनी तिच्या या फोटो शूट वर भन्नाट कॉमेन्ट्स तर केल्या पण भरभरून मीम्स देखील केले.



सईच्या फॅन्सने एकाहून एक कमालीचे मीम्स बनवून हा लूक आोणखी चर्चेत आणला आहे. एका फॅनने हा झेब्रा भारताबाहेर गेला नाही पाहिजे असं म्हटलं तर एका फॅनने हाऊ टू कंट्रोल व्हीएकल असा मीम्स क्रिएट केला ! सईने हे सगळे मीम्स तिच्या सोशल मीडिया वर शेयर केले आहेत.



प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी सई तिच्या प्रेक्षकांची सुपरस्टार सई तर आहे पण तिच्या अनेक नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांना देखील ती तितकाच न्याय देऊन त्या साकारताना दिसते.




आगामी काळात सई अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असून बॉलिवूड आणि मराठी या दोन्ही विश्वात ती काम करताना दिसणार आहे. ग्राउंड झीरो, अग्नी, गुलकंद, असंभव, डब्बाकार्टेल अशा अनेक प्रोजेक्ट्स मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय !

Comments
Add Comment