Tuesday, April 29, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: तुम्हालाही रात्रीच्या वेळेस झोपताना खूप घाम येतो का? तर व्हा सतर्क

Health: तुम्हालाही रात्रीच्या वेळेस झोपताना खूप घाम येतो का? तर व्हा सतर्क

मुंबई: रात्री झोपताना घाम येणे ही सामान्य समस्या आहे. यासाठी अनेक कारणे असू शकतात. दरम्यान, जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात घाम येत असेल तर मात्र सावध होण्याची गरज आहे. कारण यामुळे झोप डिस्टर्ब होऊ शकते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांचे संकेतही असू शकतात.

का येतो रात्रीचा घाम?

हार्मोनल बदल

शरीरात हार्मोनल बदलामुळे रात्रीच्या वेळेस अधिक घाम येतो. ४५-५५ वयाच्या महिलांमध्ये हे असे मेनॉपॉजचे संकेत होऊ शकतात. याशिवाय थायरॉईडसारख्या समस्यांमुळे घामाची समस्या निर्माण होऊ शकते.

तणाव आणि चिंता

अधिक तणाव आणि चिंतेमुळे शरीरात अॅड्रेनालाईन हार्मोनचा स्तर वाढतो यामुळे घामाची समस्या निर्माण होऊ शकतो. अशातच तणाव कमी करण्याची गरज असते.

झोपेची कमतरता

जर तुम्ही रात्रभर जागरण करता अथवा एखाद्या कारणामुळे तुम्ही झोपू शकत नसाल तर यामुळेही अधिक घाम निघू शकतो. खरंतर झोपेच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान वाढते. यामुळे घाम येतो.

लो ब्लड शुगर

लो ब्लड शुगरच्या समस्येमुळेही शरीरातून खूप घाम येतो. ब्लड शुगर लेव्हल कमी असल्याने रात्रीच्या वेळेस शरीरातून अधिक घाम येतो.

Comments
Add Comment