Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

आई-बाबा बनल्यानंतर रणवीर -दीपिकाने खरेदी केली कोट्यावधींची रेंजरोव्हर

आई-बाबा बनल्यानंतर रणवीर -दीपिकाने खरेदी केली कोट्यावधींची रेंजरोव्हर

मुंबई: रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण गेल्याच महिन्यात पालक बनले आहेत. अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला आहे. पालक बनल्यानंतर या जोडप्यांनी आता ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे. दीपिका आणि रणवीरने लक्झरियस रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. याची किंमत कोट्यावधी रूपयांमध्ये आहे. खास बाब म्हणजे या गाडीची नंबर प्लेटही रणवीर सिंहचा लकी नंबर आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी नवी रेंज रोव्हर 4.4 LWB खरेदी केली आहे. याची किंमत ४.७४ कोटी रूपये सांगितली जात आहे. या गाडीचे रजिस्ट्रेशन ४ ऑक्टोबरला पूर्ण झाले होते. या गाडीचा नंबर ६९६९ आहे. ही रणवीरची चौथी गाडी आहे.



रेंज रोव्हर 4.4 LWB चे फीचर्स


रेंज रोव्हर 4.4 LWB च्या फीचर्सबाबतीत बोलायचे झाल्यास याचे इंजिन 4.4 L P530 इंजिन 434 bhp आणि 700 Nm टॉर्कसोबत येतो. ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत एअरबॅग, एबीएस, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्युशन, सेंट्रल लॉकिंग आणि चाईल्ड सेफ्टी लॉक आहे. याशिवाय यात टच स्क्रीन डिस्प्ले, सीडी/डीव्हीडी प्लेयर, स्पीकर, रेडिओ, यूएसबी सपोर्ट आणि ब्लूटूथ सपोर्टसारख्या सुविधांचा समावेश आहे. ३६० डिग्री कॅमेरा आणि ४ झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.



८ सप्टेंबरला आई-बाबा बनले दीपिका-रणवीर


दीपिका पदुकोणने या वर्षी ८ सप्टेंबरला एका मुलीला जन्म दिला. पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिली होती. अशातच करीना कपूर खानपासून सारा अली खानपर्यंत अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

Comments
Add Comment