मुंबई: ठाण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनची(hit and run) घटना घडली आहे. २१ ऑक्टोबरच्या रात्री एका वेगाने जाणाऱ्या मर्सिडिज कारने २१ वर्षीय तरूणाला चिरडले. यात या तरूणाचा मृत्यू झाला. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचे नाव दर्शन हेगडे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय दर्शन हेगडे २१ ऑक्टोबरच्या रात्री काही खाण्याचे सामान घेऊन आपल्या घराच्या दिशेने परतत होता. त्याचवेळेस नाशिक हायवेच्या दिशेने जाणाऱ्या मर्सिडिज कारने तरूणाला चिरडले
या घटनेनंतर कार चालक फरार झाला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे आणि कार ताब्यात घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. ही दुर्घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे स्थित निवासस्थानापासून काही अंतरावर घडली आहे.
एक महिन्यांपूर्वी घडली होती हिट अँड रनची घटना
साधारण एक महिन्यांपूर्वी मुंबईत हिट अँड रनची घटना समोर आली होती. येथील दहिसर परिसरात एका वेगवान कारने बाईकवर स्वार असलेल्या दोन तरूणांना चिरडले होते. यात एका तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा गंभीररित्य जखमी झाला. तक्रारकर्ता करण राजपूत आपला मित्र आदित्यसोबत दहिसर येथून कांदिवलीच्या दिशेने बाईकवरून जात होता. त्याचा तिसरा मित्र पियुष शुक्लाही त्याच्यासोबत बाईक चालवत होता. जसे तिघेही शैलेंद्र हायस्कूल पूलच्या खाली पोहोचले, वेगाने येणाऱ्या कारने करण राजपूतच्या बाईकला टक्कर दिली. यात करण आणि आदित्य दोघेही गंभीर जखमी झाले.