Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीTerrorist Pannu : आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी एअर इंडियातून प्रवास करु नये, कारण...

Terrorist Pannu : आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी एअर इंडियातून प्रवास करु नये, कारण…

दहशतवादी पन्नूने दिली विमान उडवून टाकण्याची धमकी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.

शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही एअर इंडियाच्या विमानांवर हल्ला करु. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियातून प्रवास करु नये, अशी धमकी पन्नूने दिली आहे.

कोण आहे पन्नू?

शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना करणारा पन्नू हा नेहमी भारताविरोधात गरळ ओकत आहे. खलिस्तानच्या नावाखाली लोकांना भडकावल्यामुळे भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पन्नू याला केंद्र सरकारने २०२० मध्ये, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्या शीख फॉर जस्टिस वरही बंदी घालण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -