मुंबई : संपूर्ण देशभरात काल करवा चौथ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलिवूडसोबतच टीव्ही अभिनेत्रींनीही करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. तसेच प्रत्येकाने इन्स्टाग्रामवर पोस्टही शेअर केले आहेत.
करवा चौथच्या निमित्ताने टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने देखील सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्याने लाल रंगाची साडी नेसून नाकात नथ, माथा पट्टी आणि बिंदीसह भन्नाट लूक केला. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ऐश्वर्याने २०२१ मध्ये अभिनेता नील भट्टसोबत लग्न केले होते. तेव्हापासून नील भट्ट देखील ‘करवा चौथ’च्या निमित्ताने त्यांची पत्नी म्हणजेच ऐश्वर्या शर्मासाठी दरवर्षी उपवास करतात, अशी माहिती नील भट्टने एका मुलाखतीत दिली.