मुंबई: बॉलिवूडपासून हॉलिवूडचा प्रवास करणारी प्रियंका चोप्रा लग्नानंतरही सर्व परंपरा पाळत आहे. प्रियंका चोप्राचे लग्न निक जोनासशी झाले. प्रियंका चोप्राने २० ऑक्टोबरला या वर्षीचे करवा चौथ केले. इन्स्टाग्रामवर तिने आपल्या व्रत, तसेच पुजेचे फोटो पोस्ट केले. यात ती परफेक्ट भारतीय नवरीप्रमाणे करवा चौथचा उपवास सोडत आहे.
नवऱ्याच्या नावाची मेहंदी
प्रियंका चोप्राने उपवास सोडताा सर्व नियमांचे पालन केले. तिच्या हातात पुजेची थाळी आहे. पती निक जोनासकडून ती उपवास सोडून घेत आहे तसेच निक तिला ग्लासातून पाणी पाजत आहे. या दरम्यान प्रियंकाच्या एका हातात दिवा आणि चाळणी आहे. दुसऱ्या फोटोत प्रियंका चोप्रा लेटर वातच आहे. या दरम्यान तिच्या हातात बांगड्या आणि अंगठी आहे. तसेच तिने भांगेमध्ये सिंदूर, कानात मोठे झुमके घातले आहेत.
View this post on Instagram
तिसऱ्या फोटात प्रियंकाने आपल्या हातावरील मेहंदी दाखवली आहे. हातावर तिने मेहंदीने दिल बनवला आहे. प्रियंकाने ट्रॅक सूटवर ओढणी घेतली आणि आपला गेटअप पूर्ण केला.
फोटो पोस्ट करण्यासोबतच प्रियंकाने करवा चौथ करणाऱ्या सर्व महिलांना हॅपी करवा चौथ म्हटले आहे. तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमधील फोटोत लिहिले की हो मी फिल्मी आहे. प्रियंकाने हे फोटोज ब्रिटनच्या लंडन येथून शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी ती भारतात काही दिवसांसाठी आली होती.