मुंबई: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रात म्हटले आहे की व्यक्तीने आपल्या जीवनात दोन गोष्टींना कधीही घाबरू नये. जर एखादी व्यक्ती बदलाला घाबरत असेल तर ती व्यक्तीही कधीही आपले लक्ष्य गाठू शकत नाही.
चाणक्य यांच्या मते बदल आपल्या आयुष्यात नेहमीच संधी आणि अनुभव घेऊन येतात. याकडे सकारात्मक पद्धतीने पाहून ते स्वीकारले पाहिजेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीला कधीही जीवनात संघर्ष करायला घाबरले नाही पाहिजे. जी व्यक्ती संघर्ष करते ती व्यक्ती आतून मजबूत होते. संघर्षाला घाबरणारी व्यक्ती कधीही पुढे जात नाही.
संघर्षामुळे व्यक्तीला आपल्यातील क्षमतांची ओळख होते. तसेच विकास होण्यासही मदत होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या व्यक्ती या दोन गोष्टींना घाबरतात त्यांचा कधीही विकास होत नाही तसेच त्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत.
याच कारणामुळे व्यक्तीला बदल आणि संघर्ष यांना नेहमीचपणे सकारात्मक पद्धतीने स्वीकारता आले पाहिजे.