Wednesday, December 4, 2024
HomeदेशIndia China Relations : भारत- चीन करार; मात्र चीनच्या कुरघोड्या थांबतील?

India China Relations : भारत- चीन करार; मात्र चीनच्या कुरघोड्या थांबतील?

भारत-चीनमधील सीमावाद संपुष्टात! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

भारत आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. मात्र, हा वाद आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी भारत आणि चीनने नवीन करार केला आहे. हा करार डेमचोक आणि डेपसांग भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. आज परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी २२-२३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या १६ व्या ब्रिक्स परिषदेसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने द्विपक्षीय चर्चेच्या शक्यतेवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी म्हणाले, ‘भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. आमचा चीनशी एलएसी मुद्द्यांवर करार आहे. परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आणि सैन्य मागे घेण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही अजूनही वेळ आणि वचनबद्धतेनुसार द्विपक्षीय चर्चेच्या मुद्द्यावर काम करत आहोत.’

भारत आणि चीनमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त घालण्यासाठी करार झाला आहे. मिसरी म्हणाले की, ‘दोन्ही देशांमधील गस्तीबाबतच्या करारानंतर एलएसीवरील तणाव कमी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय आणि चिनी वाटाघाटी गेल्या काही आठवड्यांपासून वास्तविक नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्या सोडवण्यासाठी सुरू पर्कात आहे.

२०२० पासून वाढला वाद

भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५-१६ जून २०२० रोजी चकमक झाली होती. २० भारतीय जवान शहीद झाले, तर चीनी सैनिकांची संख्या जवळपास दुप्पट आहे. चीनमधल्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कधीही आपल्या सैनिकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. मात्र, आता हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे जवळपास दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -