मुंबई: आधीच्या काळात बचतीसाठी एकच पर्याय असायचा तो म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले की त्यावरील व्याज म्हणजे बचत समजली जायची. मात्र आता काळ बदलला आहे.
बदलत्या काळानुसार भारतीयांच्या बचतीच्या पद्धतीही बदलत आहेत. त्यातच भारतीयांचे म्युच्युअल फंड बाबतचे आकर्षण वाढतच चालले आहे आणि ते यामध्ये चांगलीच गुंतवणूक करत आहेत. याचा अंदाज तुम्ही AMFIच्या ताज्या आकडेवारीवरून लावू शकता. यात पहिल्या सहामाहीचा आकडा शेअर करण्यात आला आहे.
या आकड्यांनुसार आर्थिक वर्ष २५च्या पहिल्या सहामाहीत गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये एकूण ३०,३५० कोटींची गुंतवणूक केली. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर जबरदस्त रिटर्न्स मिळत आहेत.
गुंतवणूकदारांनी या डेटामध्ये मिडकॅप कॅटेगरीमध्ये १४,७५६ कोटी रूपये तर स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये १५,५८६ कोटींची गुंतवणूक केली आहे. खास बाब म्हणजे ही मोठी गुंतवणूक सध्या पाहायला मिळाली आहे.
या आर्थिक वर्षात मिड कॅपने साधारण २० टक्के तर स्मॉल कॅप फंड्समध्ये साधारण २४ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
गेल्या वर्षी सारख्या कालावधीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या सहामाहीतील गुंतवणुकीचा आकडा कमी आहे. गेल्या वर्षी हा आकडा ३२,९२४ कोटी रूपये होता.
नोट – शेअर बाजार अथवा म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी आपल्या मार्केट एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या.