Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Suraj Chavan : केदार शिंदे आणि सूरजची कडकडून गळा-भेट!

Suraj Chavan : केदार शिंदे आणि सूरजची कडकडून गळा-भेट!

मुंबई : ‘बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 5 Winner) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) नुकताच त्याचा ३० वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी सूरज कलर्स मराठी मालिकेचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या घरी गेला होता. सूरजने केदार शिंदेंसोबत भेट घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्या व्हिडीओमध्ये केदार शिंदे आणि सूरजचे घनिष्ठ संबंध दिसून येत आहे. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



केदार शिंदेंनी सूरजला दिलं खास गिफ्ट


व्हिडिओमध्ये दिसते की केदार शिंदे सूरजच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घरी घेऊन येतात. त्यानंतर दोघेही अत्यंत प्रेमाने आणि आदराने एकमेकांना मिठी मारतात. केदार यांनी सूरजला खास भेटवस्तूही दिली आहे. विठ्ठलाची मूर्ती आणि सोनेरी रंगाच्या पादुका अशी विशेष भेटवस्तू केदार शिंदे यांनी दिली. तसेच त्या गिफ्टचा अर्थही मोठ्या आपुलकीने केदार यांनी त्याला समजावला. सूरजने व्हिडिओ शेअर करताना 'भेटला विठ्ठल माझा...' हे गाणे बॅकग्राउंडसाठी वापरले आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)





दरम्यान, एका मुलाखतीत सूरजने केदार शिंदे यांचा उल्लेख ‘ते माझे देव आहेत’ असा केला होता. त्यामुळे या गुरू-शिष्याचं नातं पाहून नेटकरी या व्हिडीओवर कौतूकाचा वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment