Sunday, December 15, 2024
Homeक्रीडाIND vs NZ:रोहितसोबत आता हा खेळाडू करणार सलामी, कुलदीपचा पत्ता होणार कट?

IND vs NZ:रोहितसोबत आता हा खेळाडू करणार सलामी, कुलदीपचा पत्ता होणार कट?

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड(india vs new zealand) यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका(test series) खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवला जाईल. मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात किवी संघाने ८ विकेटनी बाजी मारली होती. अशातच टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत दुसरा कसोटी सामना जिंकावा लागेल. जाणून घ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असू शकते.

सर्फराजने वाढवले रोहित-गंभीरचे टेन्शन

कसोटी संघात तीन नंबरवर खेळणाऱ्या शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळला नव्हता. तो आजारी होता. दरम्यान, आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. पहिल्या कसोटीत गिलच्या जागी सर्फराज खानला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले होता. सर्फराजने दुसऱ्या डावात १५० धावांची शानदार खेळी केली. अशातच आता गिलच्या पुनरागमनावरून सवाल उपस्थित केला आहे.

अचानक वॉशिंग्टन सुंदर संघात झाला सामील

पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयने अचानक टीम इंडियामध्ये बदल केला आहे. स्पिन ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीच्या आधी टीम इंडियात सामील केले आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की रवीचंद्रन अश्विन पूर्णपणे फिट नाही आहेत.

दुसऱ्या कसोटीत काय असू शकते बदल?

दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलचे पुनरागमन ठेवले जात आहे. तीन नंबरवर तो खेळताना दिसू शकतो. चायनामन स्पिनर कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. तर केएल राहुलची संघातून सुट्टी होऊ शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचे संभाव्य खेळाडू

यशस्वी जायसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल/वाशिंगटन सुंदर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -