मुंबई: थंडी काहीच दिवसांत येणार आहे. या मोसमात कुडकुडणाऱ्या थंडीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक तर या मोसमात अनेक दिवस आंघोळही करत नाही तर अनेकजण गिझरच्या गरम पाण्याने दररोज आंघोळ करतात.
गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरं वाटतं तसेच शरीरालाही रिलॅक्स वाटतं. मात्र तुम्हाला माहीत आहे का थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसानही होते. यामुळे आरोग्यासही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सावधानता बाळगली पाहिज.
त्वचेच्या समस्या
थंडीच्या दिवसांत गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेच्या समस्या होऊ शकतात. गरम पाण्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा रुक्ष आणि निर्जीव होते. यामुळे त्वचेवर डाग, खाज तसेच जळजळ होऊ शकते.
केस गळतात
गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने केसांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यामुळे केसांचीमुळे कमकुवत राहतात. यामुळे केस गळतात आणि टक्कलही पडू शकते.
हृदयाचा धोका वाढतो
गिझरच्या पाण्याने आंघोळ केल्याने धोकाही वाढतो. खरंतर गरम पाण्याने आंघोळ केल्याने रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतो. यामुळे हृदयावरचा दबाव वाढतो. थंडीच्या दिवसांत खूप गरम पाणी वापरू नका.
आंघोळीसाठी थंडीच्या दिवसांत गरम पाण्याच्या जागी कोमट पाण्याचा वापर करा.
आंघोळीनंतर त्वचेवर मॉश्चरायजर लावा.