पाहा सविस्तर माहिती
मुंबई : भरघोस पागारासह सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची २५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने सीनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट, सुपर स्पेशलिस्ट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
वयोमर्यादा
कर्मचारी राज्य विमा महामंडळात सीनियर रेजिडेंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. तसेच स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६९ वय असावे.
शैक्षणिक पात्रता
नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/डीएनबी/ डिप्लोमा केला असावा. तर सुपर स्पेशलिस्ट पदासाठी नेफ्रोलॉजी आणि न्युरोलॉजी पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.
वेतन
स्पेशलिस्ट पदासाठी उमेदवारांना १ लाख २१ हजार रुपये पगार मिळणार आहे. तसेच सुपर स्पेशलिस्ट पदासाठी २ लाख रुपये पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
ईएसआयसी भरतीमधील नोकरीसाठी लॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती केली जाणार आहे. हा इंटरव्ह्यू २९ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांना २०७, दुसरा माळा, ईएसआयसी मॉडेल हॉस्पिटल, जयपुरस राजस्थान येथे उपस्थित राहावे लागणार आहे.