Monday, September 15, 2025

Coxsackie virus : पावसाळ्यानंतरही आजारांचा विळखा कायम! मुंबईत चिमुकल्यांमध्ये वाढतोय कॉक्ससॅकी व्हायरसचा धोका

Coxsackie virus : पावसाळ्यानंतरही आजारांचा विळखा कायम! मुंबईत चिमुकल्यांमध्ये वाढतोय कॉक्ससॅकी व्हायरसचा धोका

पाहा लक्षणे आणि उपाय

मुंबई : परतीच्या पावसाचा जोर ओसरला असून हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे संसर्गजन्य आजार पसरतात. मात्र पावसाळा संपल्यानंतरही शहरात विविध आजाराचा विळखा कायम असल्याचे दिसून येत आहे. सध्या मुंबईत कॉक्ससॅकी व्हायरसने थैमान घातले आहे. हा आजार लहान मुलांमध्ये पसरत चालला आहे. जाणून घ्या काय आहेत या व्हायरची लक्षणे आणि उपाय.

काय आहेत लक्षणे?

या व्हायरसचा संसर्ग झाल्यावर घसा खवखवणे, घशात वेदना आणि सूज येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, तोंडात व्रण येणे तसेच हात-पायावर पुरळ येणे ही लक्षणे दिसून येतात.

प्रतिबंधात्मक उपाय

साबणाने आणि पाण्याने हात धुणे, संक्रमित व्यक्तीपासून अंतर राखणे, स्वच्छता राखणे, त्याचबरोबर गर्दीची ठिकाणावरही येणे-जाणे टाळले पाहिजे.

Comments
Add Comment