मुंबई: स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण फोनच्या कव्हरचा वापर करतात. यामुळे फोन पडण्यापासून बचाव होतो. मात्र कव्हर लावण्याचे अनेक नुकसानही आहेत.
मागील कव्हरमुळे फोनची उष्णता योग्य पद्धतीने पास होत नाही. यामुळे फोन लवकर गरम होतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. फोन गरम होणे त्यातील अनेक पार्टसाठी चांगले नसते. तुमच्या स्मार्टफोनचे अनेक सेन्सॉर असतात जे अधिक उष्ण झाल्याने खराब होऊ शकतात.
अनेकदा हेही पाहायला मिळाले आहे की मागील कव्हरमुळे फोनला सिग्नल कमी मिळतो. यामुळे कॉल क्वालिटी आणि इंटरनेट स्पीडवरही परिणाम होतो. इतकंच नव्हे तर फोनच्या कव्हरमुळे फोन अधिक गरम होतो. तसेच चार्जिंग स्पीडही स्लो होतो. याचा परिणाम आपल्या बॅटरीवरही पडू शकतो.
स्मार्टफोन गरम झाल्याने त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होतो. फोन अधिक उष्ण झाल्याने अनेक फीचर्स काम करणे बंद होतात आणि अनेकदा तर फोन ऑफही होतो.
नेहमी योग्य कव्हर खरेदी करा
स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य बॅक कव्हर निवडले पाहिजे. ब्राँडेड फोन्ससाठी स्पेशल कव्हर बनवलेले असतात जे थोडे महागडे असतात. तुम्ही त्यातील निवडू शकता.
विना कव्हरचा वापर
जर तुमच्या हातातून फोन पडत नसेल आणि तुम्ही डिव्हाईसचे नीट लक्ष देत असाल तर तुम्ही स्मार्टफोन विना कव्हर वापरू शकता. यामुळे तुम्हाला वेगळा अनुभव भेटेल. दीर्घकाळ फोनला जर कव्हर लावून ठेवले तर फोनवर निशाण पडतात. याशिवाय अनेक पार्ट्समध्ये घाणही जमा होते. यामुळे तो वेळच्या वेळी साफ केला पाहिजे.