मुंबई: डेस्क जॉब करणाऱ्यांमध्ये डेस्कसमोर उभे राहून काम करण्याची क्रेझ वाढत आहे. लोकांच्या मते डेस्कवर बसून काम केल्याने शरीराची हालचाल होत नाही. काही तास उभे राहून काम केल्यास त्याची भरपाई करता येते. अनेकांचे म्हणणे आहे की सतत बसून काम करत राहिल्याने स्ट्रोक आणि हॉर्ट फेल्युअरसारख्या समस्या येऊ शकतात. थोडा वेळ उभे राहून काम केल्याने याचा धोका कमी होतो.
मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार उभे राहून काम केल्याने फायदे नव्हे तर शरीरास अनेक प्रकारे नुकसान होते. अभ्यासात दिसून आले की बराच वेळ डेस्कवर उभे राहून काम केल्याने पायांच्या नसा सुजतात. तसेच रक्ताच्या गुठळ्या वाढण्याचाही धोका वाढतो.
उभे राहून काम केल्याचे दुष्परिणाम
सिडनी युनिर्व्हसिटीकडून केल्या गेलेल्या अभ्यासानुसार दिवसभरात दोन तासांपेक्षा अधिक वेळ उभे राहिल्याने डीप व्हेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरिकोज वेन्ससारख्या समस्या वाढण्याचा धोका वाढतो.
डेस्क जॉब करणाऱ्यांनी आरोग्याचा धोका कमी करण्यासाठी काय करावे
जे लोक नियमितपणे बराच काळ बसून राहतात त्यांनी मध्ये मध्ये जागेवरून उठले पाहिजे. तसेच नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.