पाहा कसे असतील मार्ग?
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दोन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या पुणे शहरात पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा तीन वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. अशातच आता हा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबतची सविस्तर माहिती अद्यापही रेल्वे बोर्डाकडून आलेली नाही.
तिकीट दर काय ?
पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत एक्स्प्रेससाठी प्रत्येक प्रवाशाकडून ५६० रुपये दर आकारले जात आहे. त्याशिवाय या एक्स्प्रेसमध्ये ५२ एक्झिकिटीव्ह (Executive) क्लास आहे. यामध्ये एका तिकीटाची किंमत ११३५ पर्यंत आहे.