Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीBJP Candidate List : भाजपाकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!

BJP Candidate List : भाजपाकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर!

पाहा कोणाला मिळाली संधी?

मुंबई : भाजपाकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या ९९ उमेदवारांचा समावेश असून या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना नागपूर दक्षिण पश्चिम येथून उमेदवारी, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांना कामठी मतदारसंघ, खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण  यांना भोकरमधून तर कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

तर मुंबईत वांद्रे पश्चिम येथून आशिष शेलार, वडाळा येथून कालिदास कोळंबकर, मलबार हिल येथून मंगल प्रभात लोढा,  घाटकोपर येथून राम कदम, अंधेरी येथून अमित साटम, मालाड येथून विनोद शेलार, भिवंडी येथून महेश चौघुले, डोंबिवली येथून रविंद्र चव्हाण, ठाणे येथून संजय केळकर यांना देखील उमेदवारी मिळाली आहे.

पाहा संपूर्ण यादी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -