जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : दोन वर्षापूर्वी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ ही मालिका प्रदर्शित झाली होती. सर्वांचा लाडका सिध्दू म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने या मालिकेचे होस्टींग केले होते. सिद्धार्थची विनोदी शैली आणि एनर्जीमुळे प्रेक्षकांनी या मालिकेला भरघोस प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून धिंगाणा घालण्यासाठी सज्ज होणार आहे. लवकरच ‘होऊ दे धिंगाणा’चे तिसरे पर्व (Aata Hou De Dhingana 3)प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याबाबतचा प्रोमोदेखील शेअर करण्यात आला आहे.
स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ‘मुक्काम पोस्ट…धिंगाणा बुद्रुक…आपला सिद्धू घेऊन येतोय नवं पर्व’ असे म्हणत आहे.
कधीपासून होणार सुरु?
आता होऊ दे धिंगाणा’चे तिसरे पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सिद्धार्थचा धिंगाणा पाहता येणार आहे.