Saturday, May 10, 2025

कोलाजसाप्ताहिक

सावळे सुंदर रूप...

सावळे सुंदर  रूप...

सावळे सुंदर रूप मनोहर।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥


आणिक कांही इच्छा
आम्हां नाही चाड ।
तुझे नाम गोड पांडुरंगा ॥२॥


जन्मोजन्मी ऐसे
मागितले तुज ।
आम्हांसी सहज
द्यावे आतां ॥३॥


तुका म्हणे तुज ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥४॥



गीत : संत तुकाराम
स्वर : पं. भीमसेन जोशी


जेव्हा तुझ्या बटांना...


जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,
माझा न राहतो मी हरवून हा किनारा


आभाळ भाळ होती,
होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या,
नही मुळी निवारा


डोळे मिटून घेतो,
छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठावरी झुकेना
देशील का कधी तू,
थोडा तरी इशारा


नशिबास हा फुलांचा,
का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा,
नुसताच भास होता
केव्हा तुझ्या कुशीचा, उगवेल सांग तारा



गीत : मंगेश पाडगांवकर
स्वर : सुरेश वाडकर

Comments
Add Comment