मुंबई: राजस्थानातील धौलपूरमध्ये मोठा अपघात झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बसने टेम्पोला धडक दिली. या दुर्देवी अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमद्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तीन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात एनएच ११ बीवर सुनीपूर गावाजळ घडला. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाडी शहराच्या गुमट मोहल्लाचे निवासी आहेत. हे सर्व लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सामील होऊन परतत होते. अपघतात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
बसचा वेग खूप होता
ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बसचा वेग खूप होता. ही टक्कर इतकी भीषण होती की लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. या दरम्यान, हायवेवरून जाणारे लोक तातडीने जखमींच्या मदतीसाठी आले आणि पोलिसांना घटनेची सूचना दिली.