मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. यात विविध किंमतीच्या विविध प्लान्सचा समावेश आहे. त्याचे फायदेही वेगवेगळे असतात. अशातच आम्ही तुम्हाला एका स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत.
आज आम्ही तुम्हाला ४७९ रूपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि बरेच काही फायदे मिळतात. या प्लानमध्ये केवळ ६ जीबी इंटरनेट डेटा वापरण्यासाठी मिळतो. हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे जे केवळ कॉलिंगसाठी प्लान्स शोधत असतात.
मिळणार अनलिमिटेड कॉलिंग
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटिडी कॉल दोन्हींचा समावेश आहे.
जिओच्या या प्लानमध्ये ४७९ रूपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला १००० एसएमएस मिळतील. हे मेसेज कम्युनिकेशनसाठी वापरात येऊ शकतात.
जिओच्या या प्लानची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर साधारण ३ महिने हा प्लान सुरू राहतो. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.