Friday, December 13, 2024
Homeक्रीडाIND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठा बदल

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरूच्या के. एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाला आठ विकेटनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनी भारतीय जमिनीवर कसोटीत विजय मिळवला. आता दोन्ही देशांदरम्यान दुसरा सामना २४ ऑक्टोबरला पुण्यात खेळवला जाईल.

आता दुसऱ्या कसोटीच्या आधी भारतीय संघात बदल पाहायला मिळत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला या मालिकेती इतर दोन संघांसाठी सामील करण्यात आले आहे. सुंदर दुसऱ्या कसोटीच्या आधी पुण्यात भारतीय संघासोबत असेल. सुंदरने रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी १५२ धावांची खेळी केली होती.

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ –

रोहित शर्मा (कप्तान), जसप्रीत बुमराह (उप-कप्तान), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंगटन सुंदर.

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव

बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला ८ विकेटनी पराभव सहन करावा लागला. सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी घेतली. पहिल्या डावात ४६ धावांवर भारतीय संघ ऑलआऊट झाला. त्यानंतर पहिल्या डावात बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने ४०२ धावा बोर्डावर झळकावल्या. यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४६२ धावा करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान ठेवले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने २ बाद ११० धावा करत ८ विकेटनी विजय मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -