Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

ST Bus : एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दिवाळीत पुणे - अमरावती दरम्यान धावणार अतिरिक्त बस

ST Bus : एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दिवाळीत पुणे - अमरावती दरम्यान धावणार अतिरिक्त बस

अमरावती : दरवर्षी दिवाळीत पुणे येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह कामानिमित्त नोकरीत असलेल्या प्रवाशांची अधिक संख्या असल्याने ते दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे परतात. परंतु खासगी बसचालक याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा तिकिट दर आकारून त्यांची आर्थिक लुट करतात. यामुळे प्रवाशांना सुविधा देण्याकरीता दरवर्षी एसटी महामंडळाच्या (ST Bus Corporation) वतीने पुणे या मार्गावर अतिरिक्त बसेस सोडल्या जातात. एसटी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी पुणे येथून अमरावतीकडे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून येण्याकरीता २७ ते ३१ ऑक्टोबर व अमरावती येथून जाण्याकरीता ३ ते १० नोव्हेंबर दरम्यान ५० अतिरिक्त बसेस म्हणजेच १०० फेऱ्या होणार आहे. या व्यतिरिक्त यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपुर, वाशिम आधी ठिकाणी देखील प्रवाश्यांची संख्या वाहून अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहे. याकरीता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा करण्यात आली असून आतापर्यंत २१ बसेसचे पुणे येथून अमरावतीकरीता बुकींग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी केले आहे.



अशी करा ऑनलाईन बुकींग


प्रवाशांनी ऑनलाईन बुकींग रेड बस तसेच अ‍ॅप्सवर राज्यपरिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावून करता येणार आहे. याकरीता सांकेतिक कोड देण्यात आला आहे. पुणे करीता पीसीएनटी व अमरावती करीता एएमटी कोड चा वापर कराता येणार आहे.

Comments
Add Comment