Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीपरतीच्या पावसात धुक्याचे सावट; बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण!

परतीच्या पावसात धुक्याचे सावट; बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण!

खोपोली : परतीच्या पावसात धुक्याचे सावट पसरले आह. तर पहाटे गारवा,दुपारी रणरणत्या उन्हाने नागरीक हैराण झाले आहेत. वातावरणात सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्याचबरोबर दुपारी रणरणत्या उन्हामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहे. पहाटे धुके मोठ्या प्रमाणात पडत असले तरी सुद्धा सायंकाळी आकाशात ढग दाटून येत आहे. यामुळे हा पावसाळा म्हणावे की उन्हाळा म्हणावा की हिवाळा अशिच स्थिती बळीराजाची झाली आहे. भात शेती उत्तम बहरली असून काही ठिकाणी धरतीवर सोनेरी शाल परिधान केलीली जाणवू लागले आहे. मात्र सायंकाळ होताच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळत आहे.

अनेक दिवस विश्रांतीवर गेलेल्या या पावसामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढला. घामाच्या धारांनी नागरिक अक्षरश: हैराण झाले. जवळपास संपूर्ण कोकणात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. पावसाच्या सरीही मोठ्या होत्या आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी भाताच्या पिकाची कापणी केली होती. मात्र, या परतीच्या पावसामुळे ते भातपीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सकाळी जरी वातावरणात धुके पडत असले तरी सुद्धा गुलाबी थंडी जाणवत नाही. मात्र धुक्यामुळे वाट काढले वाहनचालकांस अवघड जात आहे.

त्याचबरोबर दुपारी सुर्यदेवाचे ते उग्र रुप आंगातून अक्षरशा: घामाच्या धारा वाहू लागत आहे. सायंकाळी अकाशात ढग निर्माण होवून पाऊस पडत असल्यामुळे शेतात तयार झालेले धान्य या पावसामुळे नुकसान होण्याच्या मार्गावर असतान शेतकरी चांगलाच धास्तावलेले आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा तयार झाला असून सुर्याच्या प्रखर उष्णतेमुळे लोंब्यातील दाणा अलग होत आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भात कापणी खोळंबली आहे. पाऊस पडला तर हाताला भाताचा दाणा मिळणार नाही. या विचारांतून बळीराजा मोठ्या संकटात सापडले आहे. दरवर्षी हस्त नक्षत्रांचा पाउस शेतीचे नुकसान करीत असल्यामुळे शेती करण्यासाठी बळीराजा पाठ फिरवत आहे. मात्र आपला उदारनिर्वाह शेतीवरच असल्यामुळे शेती शिवाय पर्याय नाही. पाऊस शांत झाला असता तर भात कापणींस पारंभ झाला असता, मात्र सायंकाळी येत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -