मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड.आशिष शेलार यांचा आरोप
मुंबई : शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानीसाठी आहे.आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
धारावीबाबत आज पुन्हा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केले. कोणीही विचारले नसताना आपले पिताश्री वारंवार सांगतात हा मर्दांचा पक्ष आहे म्हणून जर तुम्ही मर्दांचा पक्ष असाल तर खुल्या चर्चेला या, तुम्ही सांगाल तिथे चर्चेला यायला मी तयार आहे. आदित्य ठाकरे यांना उत्तरे देता येत नाहीत म्हणून आमच्या वर्षाताई गायकवाड यांना पुढे करुन अडचणीत आणू नका, असेही आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले. आपल्याच परिवारातील प्राणी मित्र एका युवकांसाठी धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड बळकवण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या पक्षाकडून होतोय. त्यासाठीच धारावी पुर्नविकासाला विरोध केला जातोय असा अरोप आज पुन्हा एकदा आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.
अदानीला अधिकचा एफएसआय दिला असे खोटे पसरवले जाते आहे, पुर्नविकासाच्या प्रचलीत नियमापेक्षा एक इंचही अधिकचा एफएसआय धारावीसाठी देण्यात आलेला नाही त्यामुळे केवळ खोटं पसरवून, धारावीकरांची माथी भडकवून मते मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करीत आहेत. मुंबईकरांनी सावधान झाले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जो शिक्का धारावीच्या माथी आहे तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. ४३० एक जागेपैकी २३० एकर जागेमध्ये मोकळया जागा, मैदान, बगिचा, मेट्रो, बस, मोनो, रेल्वे, भूयारी मेट्रोचा मल्टी कॉरिडॉर ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे त्याला विरोध करुन त्यापासून मुंबईकरांना वंचित ठेवले जाते आहे. या भागातून मुंबई महापालिकेला एकही रुपयांचा मालमत्ता कर, सिव्हरेज टॅक्स, दुकान लायन्सन फी मिळत नाही हे उत्पन्न वाढवणारे तसेच रेंटल घर योजनेतून, घरांच्या विक्रीतून मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे त्याला विरोध केला जातोय. मुंबईत करून सावधान आणि म्हणून आमची विनंती आहे मुंबईकर तुम्ही व्यक्त व्हा, मुंबईकर तुम्ही तुमच्या मुलभूत अधिकारासाठी व्यक्त व्हा आणि धारावीकर हो तुम्ही तुमच्या हक्कासाठी व्यक्त व्हा, असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांची लढाई अदानासाठी आहे आमची लढाई गरिबांच्या घरासाठी आहे.