युक्रेन-रशिया युद्धात उत्तर कोरियाही उतरला, पाठविले १२ हजार सैनिक

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा


सेऊल : युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाने आपले १२,००० सैन्य पाठविले आहे. यामध्ये तगड्या सैन्य तुकडीचा विशेष मोहिमांसाठी समावेश असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी दिली आहे.


योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटलंय की, रशियाला मदत करण्यासाठी उत्तर कोरियाचे सैन्य आधीच रवाना झाले आहेत. हे माहिती समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली.


दक्षिण कोरियाच्या कार्यालयाने केलेल्या निवेदनानुसार, उत्तर कोरियाकडून सैन्य पाठवणे हा दक्षिण कोरिया आणि जगाच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याची भीती बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आता या घडामोडींमुळे तणावामध्ये आणखी वाढ झाली आहे.




महायुद्ध : झेलेन्स्की


युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय की, युक्रेनच्या विरुद्ध लढणाऱ्या रशियन सैन्याला मदत करण्यासाठी १०,००० उत्तर कोरियाचे सैन्य तयार केले जात असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. जर यामध्ये तिसरा देश युद्धात सामील झाला तर संघर्ष “महायुद्धात” बदलू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.



अशीही मदत...


नाटोचे महासचिव मार्क रटे यांनी म्हटलंय की, आमच्याकडे उत्तर कोरियाचे सैन्य युद्धात सहभागी झाल्याचा कोणताही पुरावा नाही आहे. मात्र, रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा, युद्धात पाठिंबा देण्यासाठी तांत्रिक पुरवठा अशा अनेक मार्गांनी उत्तर कोरिया मदत करत आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.



ओलिसांना साेडणार नाही : हमास


- ७ ऑक्टाेबर २०२३ राेजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हमासचा म्हाेरक्या याह्या सिनवार ठार झाल्याचे हमासने मान्य केले.


- शस्त्रसंधी जाेपर्यंत हाेत नाही, ताेपर्यंत इस्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणार नसल्याचे हमासने जाहीर केलं आहे. तर, दुसरीकडे इस्रायलने युद्ध सुरूच ठेवण्याच ठरवलं आहे.


पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ व २३ ऑक्टोबर रोजी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी या परिषदेसाठी निमंत्रित केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


ब्रिक्स पश्चिमविरोधी नाही : पुतिन : रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी कोणाला विरोध करणे हा ब्रिक्सचा उद्देश नसल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला. ब्रिक्स हा पश्चिमेत्तर गट जरी असला तरी त्याचा पश्चिम देशांना विरोध नसल्याचे पुतिन यांनी म्हटलंय.


ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यादरम्यान ते अनेक नेत्यांशी चर्चादेखील करतील. ही भेट युद्ध सुरू असताना होत असल्याने ही परिषद महत्त्वाची मानली जाते आहे.

Comments
Add Comment

Israel - Iran War : चर्चेसाठी खूप उशीर झाला; आता माघार नाही - डोनाल्ड ट्रम्प

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

मोजतबा खामेनी इराणचे नवे सर्वोच्च नेते

तेहरान : इस्रायलच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अयातुल्ला अली खामेनींच्या (८६) मृत्यूनंतर त्यांचा

इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू, चौघांची ओळख पटली

वॉशिंग्टन डीसी : इराणने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. यापैकी चार

Israel - Iran War : अमेरिकेचा इराणवर सागरी हल्ला; १७ इराणी जहाजे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा

मध्य-पूर्वेतील महायुद्ध आता जमिनीवरून समुद्रात पोहोचलं आहे. अमेरिकेने इराणला आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे.

Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे नांदेडमध्ये पेट्रोलचा तुटवडा? सोशल मीडियावरील एका मेसेजने उडवली झोप; टाक्या 'फुल्ल' झाल्या, पण...

नांदेड : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत

Dubai Abu Dhabi news : दुबईत खळबळ: अमेरिकन दूतावासावर इराणी 'शाहेद' ड्रोनचा हल्ला, भीषण आग!

अबू धाबी : मध्य-पूर्व आशियातील संघर्ष आता एका भयंकर वळणावर येऊन पोहोचला आहे. इराणकडून होणाऱ्या सततच्या