Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Assembly Election 2024 : महायुतीचं ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत १५...

Mumbai Assembly Election 2024 : महायुतीचं ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत १५ जागा लढण्याची शक्यता; अजितदादांच्या आणि भाजपच्या वाट्याला काय?

नवी दिल्ली : मुंबईत (Mumbai) शिवसेना शिंदे (Shiv Sena Shinde Group) गट १५ जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील एकूण १७ जागांवर काही महिन्यांपूर्वी शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. आता या १७ पैकी १५ जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, उर्वरित जागा भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला (NCP) मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील महायुतीचा (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईत शिंदे गट १५ जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती, तर भाजप १७ किंवा १८ जागा आणि राष्ट्रवादी ३ किंवा ४ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला :

शिवसेना : १५ जागा
भाजप : १७ किंवा १८ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट : ३ किंवा ४ जागा

शिवसेनेच्या निरीक्षक नेमलेल्या ‘त्या’ १७ जागा 

भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, धारावी, भांडुप पश्चिम, माहीम, विक्रोळी, मागठाणे, चांदिवली, कलिना, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, या १७ जागांवर शिवसेनेनं निरीक्षक नेमले होते. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी या निरिक्षकांची निवड करण्यात आली होती.

विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फार पूर्वीच कंबर कसली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात ११३ विधानसभा मतदारसंघातील ४६ विधानसभा प्रभारी जाहीर केल्या होत्या. तसेच, ९३ विधानसभा निरीक्षकपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या.

महायुतीतल्या जागावाटपाचा तिढा सुटला?

महायुतीतमधल्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागांबाबत दिल्लीमध्ये अमित शाहांच्या समक्ष चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाहांसोबत अडीच तास चर्चा झाली. जागावाटपाचा तिढा आता तीनही नेत्यांनी सोडवला असल्याची माहिती आहे. आता फक्त काही जागांचाच प्रश्न बाकी आहे अशी माहिती दिल्लीतून समजतेय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -