इस्रायल : इस्रायलच्या कैसरिया भागात हिजबुल्लाहने तीन ड्रोन्सच्या माध्यमातून नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे हिजबुल्लाहच खरं टार्गेट या भागातील इस्रायली पंतप्रधानांच निवासस्थान होतं. हिजबुल्लाहचे इस्रायलने दोन ड्रोन्स पाडले. पण एक ड्रोन कैसरियामधील एका इमारतीवर जाऊन आदळलं. आयडीएफनुसार, या हल्ल्यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीय. इस्रायली सैन्यांनी दोन ड्रोन्स पाडले असून चौकशी सुरु आहे.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून कैसरिया ड्रोन हल्ल्याबद्दल स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे. बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी कैसरिया हल्ल्याच्यावेळी येथील निवासस्थानी नव्हते. इस्रायली पंतप्रधानांच्या निवासस्थानाला हिजबुल्लाहने ड्रोन हल्ल्याद्वारे चांगलंच लक्ष्य करण्याच प्रयत्न केला आहे. हिजबुल्लाहच ड्रोन परिसरात घुसताच सायरन वाजू लागलं. यानंतर इस्रायली सैन्याने हेलीकॉप्टरद्वारे ड्रोनला टार्गेट केलं.
इस्रायलचे सर्व भाग टार्गेटमध्ये : नईम कासिम
इस्रायलने २३ सप्टेंबरला लेबनानमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध सैन्य अभियान सुरु केलं होतं. या दरम्यान २७ सप्टेंबरला हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा बेरुत येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. इस्रायलने ऑक्टोंबरच्या सुरुवातीला नसरल्लाहचा उत्तराधिकारी सफीद्दीनला मारल्याचा दावा केला होता. हिजबुल्लाहने त्यानंतर इस्रायलवरील हल्ले वाढवले आहेत. हिजबुल्लाहचा डेप्युटी चीफ नईम कासिमने काही दिवसांआधी इस्रायलचे सर्व भाग त्याच्या टार्गेटमध्ये आहेत, असं म्हटलं होतं.
इतक्या हजार लोकांना जुनं घर सोडावं लागलं
लेबनानमध्ये हिजबुल्लाह विरुद्ध इस्रायली हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यात २३ सप्टेंबरपासून सुरु असलेल्या आतापर्यंत जवळपास २००० लोकांचा मृत्यू झाला आहे. १२ लाखापेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. उत्तर इस्रायलवर हिजबुल्लाहकडून हल्ले सुरु होते, त्यामुळे ६० हजार ज्यूंना लोकांना आपल घर सोडावं लागलं आहे.
हिजबुल्लाहची सर्व टॉप लीडरशिप संपवली
या सर्व ज्यूंना लोकांना इस्रायलने पुन्हा आपल्या घरी उत्तर इस्रायलमध्ये आणण्याचा संकल्प करुन हिजबुल्लाह विरोधात मोठी सैन्य करावाई सुरु केली. हिजबुल्लाहची इस्रायलने जवळपास सर्व टॉप लीडरशिप संपवली आहे. आता हिज्बुल्लाह इस्रायलच्या हल्ल्यांमुळे अजून आक्रमक झाला आहे. आता नेतन्याहू यांच्या घराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.