Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सआई तुळजाभवानी साकारताना मिळते सकारात्मक ऊर्जा

आई तुळजाभवानी साकारताना मिळते सकारात्मक ऊर्जा

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल 

पूजा काळे या नवोदित अभिनेत्रीने अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठला आहे. आई तुळजाभवानी मालिकेतून तिचे देवीचे रूप प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहे.लहानपणापासून तिने भरतनाट्यम् व कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तिची आईदेखील क्लासिकल डान्सर व कलाकार आहे. ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकाचे त्यांनी शंभरपेक्षा जास्त प्रयोग केले आहेत. त्यांची स्वतःची नृत्य संस्था आहे. गांधर्व महाविद्यालयाच ते सेंटर आहे कल्याणमध्ये १९८४ सालापासून त्यांची नृत्य संस्था कार्यरत आहे. दूरदर्शन वरील ‘दम दमा दम’ या कार्यक्रमात तिच्या आईने परिक्षकांची भूमिका बजावली होती. टी. सिरीज, कृणाल कंपनीसाठी तिच्या आईने कोरिओग्राफी केलेली आहे. कल्याण रत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. तिचे वडील बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तिचा भाऊ मृदुंग विशारद आहे. तो तबला, हार्मोनियम, बासरी वाजवतो.कोणाचे नशीब कधी बदलेल हे कोणी सांगू शकत नाही. नंतर पूजाच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. पूजाच्या इंस्टाग्रामवरील फोटो डायरेक्टरने पाहिला व तिला आई तुळजाभवानी ही मालिका ऑफर केली. तिने मालिका स्वीकारली; परंतु नंतर तिला या मालिकेचे दडपण आले. आई तुळजाभवानीची व्यक्तिरेखा आपल्याला जमेल की, नाही याबद्दल ती साशंक होती; परंतु घरच्यांच्या पाठींब्यामुळे व त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे ती ही व्यक्तिरेखा साकारण्यास मनाने तयार झाली.

या मालिकेतील आई तुळजाभवानीच्या भूमिकेसाठी तिने दानपट्टी, लाठीकाठी, तलवारबाजी शिकली. तीन किलोचे त्रिशूळ चालविण्याचे तंत्र ती शिकली. ही भूमिका साकारताना सकारात्मक ऊर्जा मिळते असे तिचे म्हणणे आहे. आई तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी आहे. महिषासुराचा वध या मालिकेमध्ये पाहायला मिळेल. या मालिकेचे शूटिंग कोल्हापूर येथे होत आहे. ही मालिका पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कोणत्या प्रतिक्रिया दिल्या असे विचारले असता पूजा म्हणाली की, तुमच्या रुपात साक्षात देवीला पाहतोय. साक्षात देवीचे दर्शन होत आहे. तुमचे डोळे बोलके आहेत, अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या.

आई तुळजाभवानी वर ही पहिली मालिका आहे. प्रेक्षकांच्या तिच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत व ती देखील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेय. आई तुळजाभवानी बद्दल तिने भरपूर वाचन केले. पार्वती देवीला शाप मिळाला होता की तिच्या गर्भात मुलाची वाढ होणार नाही. ती आई होणार नाही. त्यानंतर पार्वती देवी पृथ्वीवर येऊन संपूर्ण जगाची आई कशी बनली. हे या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. पार्वती देवी पृथ्वीवर येऊन असूरांपासून भक्तांना कशी वाचवते हे सारे या मालिकेमध्ये पाहायला मिळेल.

आई तुळजाभवानीचा महिमा या मालिकेमधून प्रेक्षकांना पाहायला मिळतोय ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. कलर्स वाहिनीवर सोम.ते शनि. रात्री ९.०० वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -