Thursday, December 12, 2024
Homeदेश5 Days Working : बँक कर्मचा-यांना लॉटरी! फक्त ५ दिवस काम, वेळेतही...

5 Days Working : बँक कर्मचा-यांना लॉटरी! फक्त ५ दिवस काम, वेळेतही होणार बदल

नवी दिल्ली : आता देशातील सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये पाच कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही खुशखबर डिसेंबरमध्ये बँक कर्मचा-यांना मिळू शकते.

बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून सरकारकडे आठवड्यात पाच दिवस कामाची मागणी करत होते. ज्यावर सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या वर्षअखेरीस सरकार प्रलंबित मागण्या मान्य करू शकते, असे समजते.

सध्या बँक कर्मचा-यांना महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी सुटी मिळते तर पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी कामकाज करावे लागते. याबाबत कर्मचारी संघटना आणि बँक संघटना यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.

आठवड्यातून पाच तर महिन्यात १५ दिवस कामाची मागणी सरकारने मंजूर केल्यास बँक कर्मचा-यांच्या कामाच्या वेळाही बदलतील. अहवालानुसार, पाच दिवसांच्या कामात तास सुमारे ४० मिनिटांनी वाढले जाऊ शकतात. या कालावधीत बँका सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहतील तर सध्या सरकारी सुटी वगळता दुस-या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतात. बँकेतील कामकाजाच्या दिवसांबाबत बँक युनियन २०१५ पासून मागणी करत असून दर शनिवार आणि रविवारी सुट्टी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. हीच मागणी लक्षात घेऊन २०१५ मध्ये दुस-या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बँकिंग तास आणि बॅंकांतर्गत कामकाजावर नियंत्रण ठेवते त्यामुळे हा प्रस्ताव आरबीआयकडेही पाठवला जाईल. अद्यापपर्यंत या प्रस्तावावर सरकारने मंजुरीची वेळ निश्चित केलेली नाही मात्र, वर्षअखेरीस याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बँक कर्मचा-यांना पाच दिवस कामाचा आठवडा लागू झाल्यास ग्राहकांना विकेण्डला बँकेतील कामे करण्यात अडचणी येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -