निवडणूक लढविण्याबाबत परवा अंतिम निर्णय घेणार: मनोज जरांगे

जालना(प्रतिनिधी): अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची बैठक झाली. यावेळी केवळ मते आजमावून पाहण्यात आली. आजच्या बैठकीत निवडणुकीसंदर्भात काहीही ठरलेले नाही. शेवटी निर्णय २० तारखेला मराठा समाजासमोर होणार आहे. इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याने यावर चर्चा झाली, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषेदत सांगितले.

जरांगे म्हणाले की, इच्छुकांची होत असलेली गर्दी हा आक्रोश आहे, ही आक्रोशाची लाट आहे. ही लाटच विजयाकडे नेणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता मराठा समाजाशी चर्चा करूनच निवडणुकीबाबत निर्णय घेऊ. मराठा आरक्षण मागतो म्हणून आम्ही जातीयवादी नसून आम्ही सगळ्या जातीचेच काम करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करत आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीवर जरांगे म्हणाले की, आता चर्चा करून काय उपयोग. ज्यावेळी निर्णय घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी बहुतांश इच्छुकांनी तयारी दर्शवली. तर काहींनी निवडणूक लढविण्याबाबत नकारात्मकता दर्शवली.
Comments
Add Comment

पश्चिम बंगालचा बांगलादेश बनू देऊ नका : मिथुन चक्रवर्ती यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

कोलकता : अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) विरोधात तीव्र हल्ला चढवला आहे.

बविआने देऊ केल्या केवळ आठ जागा, उबाठा आघाडीतून बाहेर

विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, मनसे आणि उबाठा यांनी आघाडी

ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा एकीचा नारा

ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला

ठाण्यात काँग्रेसला खिंडार

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश